मराठी भाषा शिक्षण मंडळ
मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती यांची जोपासना करणे व भावी शिक्षकांमध्ये मराठी विषयाची अभिरुची विकसित करणे या हेतूने मराठी भाषा शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात येते. हे मंडळ विद्यार्थ्यांच्या कडून लोकशाही मार्गाने स्थापित केले जाते व चालविले जाते. याचे संघटन, नियोजन, व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या कडून केले जाते. या मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जसे मराठी सण समारंभ साजरे करणे, साहित्यिक उपक्रम घेणे, भित्तीपत्रिका प्रकाशित करणे, छोटेखानी संवाद आयोजित करणे, भाषा जत्रा भरविणे, मराठी भाषा दिन साजरा करणे इत्यादी.
ध्येये
मराठी विषयाचे शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी करण्यासाठी विविध सहयोगी उपक्रमांच्या द्वारे छात्रशिक्षकांना समृद्ध करणे.
उद्दिष्टे
१. मराठी विषयाची अभिरुची वाढविणे व भाषेचा अभिमान निर्माण करणे.
२. मराठी भाषा विषयाच्या प्रभावी अध्यापनासाठी नवनवीन अध्ययन-अध्यापन पद्धतींचा शोध घेणे.
३. मराठीचा अध्यापक म्हणून विषयाचा आशय समृद्ध करण्यासाठी विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजिय करणे.
४. मराठी भाषेतीळ साहित्याचे वाचन, लेखन, चर्चा, परिसंवाद आदींचे आयोजन करणे.
कार्य:
- मराठी भाषा व संस्कृती, साहित्य यांच्या संदर्भातील भित्तीपत्रके तयार करणे
- वार्षिक अंक तयार करणे व प्रकाशित करणे
- शाळेत काव्य वाचन, निबंध लेखन, पत्र लेखन आदी स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित करणे
- मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन मराठी साहित्यिकांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करणे
- विद्यार्थ्यांची चर्चा सत्रे साहित्यिक सम्मेलने आयोजित करणे
- समोहिक, नाट्यवचन, कथाकथन यांचे आयोजन करणे
- मराठी भाषाविषयक प्रदर्शने आयोजित करणे
- मराठी साहित्यिक यांचे स्मृती स्थळे, भाषिक केंद्रे, भाषा भवन, ग्रंथालये, पुस्तकाचे गाव येथे भेट देणे/ सहल आयोजित करणे
- विद्यार्थी लेखक, कवी यांचे लेखन प्रकाशित करणे
- भाषिक खेळांचे आयोजन करणे
- विषव कोष, शब्दकोश, संस्कृती कोष यांचा वापर करण्यासाठी जागृती करणे
- शुद्धलेखन, सुलेखन, प्रकट वाचन, भावपुर्ण वाचन कौशल्य विकासासाठी कार्यशाळा उद्बोधन सत्र आयोजित करणे.
- दैनंदिन शालेय व अन्य व्यवहारात मराठी भाषेच्या वापरास प्रोत्साहन देणे.
- मराठी भाषेचा अभिमान निर्माण करणे
मराठी भाषा शिक्षण मंडळाची रचना
महाविद्यालयात प्रति वर्षी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा व साहित्य यांची आवड निर्माण करण्यासाठी, मराठी भाषे विषयीची माहिती, ज्ञान, अद्यावत प्रगती यांची देवाण घेवाण करण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या भाषिक सर्जनशीलतेला जोपासण्यासाठी मराठी भाषा मंडळ स्थापन केले जाते. या मंडळाची रचना पुढील प्रमाणे असते.
महाविद्यालयातील सर्वच प्रवेशित विद्यार्थी हे मंडळाचे सदस्य होऊ शकतात त्यांना मंडळाचे सदस्य म्हटले जाते. मात्र २० रुपये सदस्यत्व फी भरून महाविद्यालयाच्या हजेरीपटावरील कोणीही विद्यार्थिनी मंडळाचे सदस्यत्व घेऊ शकते. या सदस्यांमधून मंडळाच्या कार्यकारिणीची निवड केली जाते. महाविद्यालयातील एकूण विद्यार्थिसंख्या लक्षात घेऊन मंडळाच्या कार्यकारिणीची संख्या ७ निश्चित केली गेली आहे व त्यात पुढील पदाधिकारी प्रत्यक्ष निवडणूक घेऊन निवडले जातात.
अध्यक्ष: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
उपाध्यक्ष: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
सचिव: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
सहसचिव: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
खजिनदार: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
सदस्य : (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
सदस्य: (विद्यार्थ्यांमधून निवडलेला)
मार्गदर्शक: प्राध्यापक (मराठी भाषा शिक्षण)
कार्यकाळ: कार्यकारिणीची कार्यकाळ एक वर्ष असेल. प्रत्यकवर्षी प्रथमवर्षाचे प्रवेश पूर्ण झाल्यावर पुढील शैक्षणिक वर्षासाठी नव्याने कार्यकारिणी गठीत केली जाईल.
कार्यकारिणी वर्ष २०२३–२४
अनुक्रमांक | विद्यार्थिनीचे नाव | पद |
०१ | ज्योती जाधव (बी. एड. द्वितीय वर्ष) | अध्यक्ष |
०२ | धनश्री ढावरे (बी. एड. प्रथम वर्ष) | उपाध्यक्ष |
०३ | क्षितिजा नाखते (बी. एड. द्वितीय वर्ष) | सचिव |
०४ | भारती घाडीगावकर (बी. एड. प्रथम वर्ष) | सह सचिव |
०५ | स्नेहा किणी (बी. एड. द्वितीय वर्ष) | खजिनदार |
०६ | मेघा नेवरेकर (बी. एड. प्रथम वर्ष) | सदस्य |
०७ | निशा माच्छी (बी. एड. प्रथम वर्ष) | सदस्य |